दहशतवादी मसूद अजहरचा भाचा उस्मान हैदरचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था  – लष्कराने जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण हा दहशतवादी मसूद अजहरचा भाचा उस्मान हैदर आहे. उस्मान हैदर हा स्नायपर स्क्वॉडचा डेप्युटी चीफ होता. त्याच्या सोबत आलेल्या साथीदाराचाही खात्मा करण्यात आला आहे. पुलवामातील त्राल भागात लष्कराच्या जवानांनी पॅरा कमांडोंसोबत दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली.

बार्शी शहरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून

हे दोन्ही दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते. लष्कराने त्यांच्या विरोधात कारवाई करताना हे घरच उडवून दिले. या चकमकीनंतर लष्कराने एक स्नायपर रायफलही जप्त केली आहे. आता या परिसरात कॉम्बिग ऑपरेशनही सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानातले चार प्रशिक्षित स्नायपर्स काश्मीरमध्ये लपून बसले आहेत अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. या चौघांनाही शोधण्याचे आव्हान लष्करापुढे होते. चार पैकी एका स्नायपरचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्रालमध्ये स्नायपरने केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. १८ सप्टेंबरपासून हे स्नायपर्स काश्मीरमध्ये लपून बसल्याचे समजते आहे. आता यापैकी एका स्नायपरचा खात्मा करण्यात यश आले आहे.