PM नरेंद्र मोदींच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची ‘मन की बात, भाजप नेते भडकले

रांची : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यावरून केंद्र आणि राज्यातील मंत्री सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसापूर्वी परिस्थितीनुसार काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून कोरोना महामारीच्या परिस्थितीबाबत सवांद साधला. त्यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी सवांद साधला. यानंतर स्वतः मुख्यमंत्री सोरेन यांनी याबाबत समाज माध्यमाद्वारे माहिती दिलीय. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली ‘मन की बात ही उजागर केली. या कारणाने भारतीय जनता पक्षाची नेते भडकले आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संपर्क साधल्याचं सांगतानाच पंतप्रधानांवर एकतर्फी संवादाचा आरोपही केला. तर आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त आपल्या ‘मन की बात’ केली. त्यांनी कामाच्या गोष्टी केल्या असल्या आणि कामाची गोष्टी ऐकल्या असल्या तर बरं झालं असतं’ असे मुख्यमंत्री सोरेन यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

सोरेन यांच्या ट्विटवरून भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. तर ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री, आहेत ते आणि केंद्रातील मंत्र्यांसहीत अनेक भाजप नेते मुख्यमंत्री सोरेन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी समोर आलीय. तसेच, तुमचं हे ट्विट फक्त हीन दर्जाचं नाही तर जनतेच्या पीडेचंही हसू उडवणं आहे ज्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी फोन केला होता. असं म्हणतानाच मुख्यमंत्रीपदाची गरिमाही ढासळल्याचा घणाघाती आरोप आसाममधील भाजपचे मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सोरेन यांना म्हटलं आहे. सोरेन यांच्या ट्विटवरून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संवैधानिक पदाची पातळी एवढ्या खालवर जाऊ देऊ नका. आपण टीम इंडिया आहोत.

तसेच, मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षांच्या कार्यकाळा दरम्यान पंतप्रधान मोदी राज्यांप्रती संवेदनशील असल्याचं मी अनुभवलंय. मी मुख्यमंत्री सोरेन यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे नागालँडचे मुख्यमंत्री नेफी रियो यांनी म्हटले आहे. तसेच, मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनी ट्विटकरून म्हटले, आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा जबाबदार पंतप्रधान मिळाला म्हणून आम्ही भाग्यशाली आहोत, असे ते म्हणाले. या दरम्यान, आपल्या राज्याशी संबंधीत मुद्यांची माहिती देण्याची परवानगी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देण्यात आली नव्हती, यामुळे ते नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त कोरोना- 19 बाबत स्थितीवर चर्चा केली आहे. असे समजते.