‘जिओ इन्स्टिट्यूट’ चा असाही करिश्मा,स्थापनेपूर्वीच मिळाले प्रमाणपत्र

नवी दिल्ली: पोलीसनामा अाॅनलाईन

सध्या सर्व भारतभरात जिओचा करिश्मा आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या जिओ इन्स्टिट्यूटने तर वेगळीच क्रांती केली आहे. तिने स्थापन होण्यापूर्वीच सर्वोत्तम असल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे आणि तेही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आहे की नाही खरा करिश्मा.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील तीन आणि खाजगी क्षेत्रातील तीन अशा भारतातील एकूण सहा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये आयआयटी मुंबईचा समावेश आहे. मात्र आश्चर्याची  गोष्ट म्हणजे यामध्ये अजून स्थापनही न झालेल्या जिओ इन्स्टिटयूला सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या सहा उच्च शिक्षण संस्थांमध्ये तीन सरकारी आणि तीन खासगी शिक्षण संस्था आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करुन या शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या समितीने देशातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या सहा शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f14903c-8411-11e8-9308-8949bb685ba9′]

आयआयटी मुंबई (महाराष्ट्र), आयआयटी दिल्ली (दिल्ली) आणि आयआयएससी बंगळुरु (कर्नाटक) यांचा समावेश आहे. तर खासगी क्षेत्रातून मनिपाल अ‍ॅकेडमी आॅफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि जिओ इन्स्टिटयूट या तीन संस्था आहेत. यातील जिओ इन्स्टिटयूट अजून सुरुही झालेली नाही.

रिलायन्स फाऊंडेशनच्यातंर्गत जिओ इन्स्टिटयूची स्थापना होणार असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. सरकारकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे जन्माआधीच जिओ इन्स्टिटयूला सरकारचे उच्च शिक्षणाचे जे नियम आहेत त्यातून सवलत मिळाली आहे.

जिओ इन्स्टिट्यूटची निवड सर्वोत्तम संस्थांमध्ये झाल्यामुळे सोशल मिडियावर युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जिओ इन्स्टिट्यूट नेमकी कोठे आहे ? तिचे लोकेशन काय ? यावरुनही मंत्रालयात जबरदस्त गोंधळ सुरु आहे.  पीआयबी अधिकाऱ्यांनी आधी ही संस्था पुण्यात असल्याचे सांगितले. तर नंतर ती नवी मुंबईत असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. पुण्यात मुख्यालय असणार तर नवी मुंबईत काम चालणार अशी सारवासारव करण्यात आली.

विद्यापीठासाठी जागेची उपलब्धता, अत्युच्च शैक्षणिक पात्रता आणि दीर्घ अनुभव असलेली कोअर टीम, विद्यापीठासाठी पुरेसा निधी, नियोजनबद्ध दूरदृष्टी अशा चार निकषांमध्ये केवळ जिओ इन्स्टिट्यूट बसत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहे.