Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉल्स आणि डेटा, सोबतच फोनसुद्धा मिळेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Phone Recharge Plan | जिओचा एक रिचार्ज प्लान असा आहे जो 2 वर्षांच्या व्हॅलिडिटीसह येतो. इतर ब्रँडकडे असे प्लान नाहीत. जिओचा हा दोन वर्षांच्या व्हॅलिडिटीचा प्लान परवडणारा आहे आणि त्यात अनेक फायदेही आहेत. या प्लानची माहिती जाणून घेऊया. (Jio Phone Recharge Plan)

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत, पण काही प्लान्स फक्त जिओ फोन यूजर्ससाठी आहेत. म्हणजेच जिओ फोन वापरणारे युजर्स. या योजनांचा लाभ त्यांनाच मिळतो. दोन वर्षांची व्हॅलिडिटी असलेला प्लान देखील असाच आहे.

Jio च्या प्लानमध्ये काय मिळेल?
यामध्ये तुम्हाला जिओच्या टेलिकॉम सेवेसह जिओ फोन देखील मिळतो. म्हणजेच, एका रिचार्जमध्ये, दोन वर्षांची व्हॅलिडिटी आणि एक फोन देखील मिळेल. या प्लानची किंमत 1999 रुपये आहे. म्हणजेच दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला रिचार्जसह फोन सुद्धा मिळेल.

Jio Recharge मध्ये, ग्राहकांना दोन वर्षांच्या व्हॅलिडिटीत मोफत व्हॉइस कॉलिंग, 48जीबी डेटा आणि जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. ही योजना नवीन यूजर्ससाठी आहे. म्हणजेच जे नवीन जिओ फोन खरेदी करतील त्यांना ही ऑफर मिळणार आहे.

Jio Phone मध्ये काय आहे विशेष?
जिओ फोन फीचर फोन असूनही खास आहे. कारण यामध्ये तुम्हाला 4जी सेवा मिळते.
फोनमध्ये 2.4-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवू शकता.

यामध्ये WhatsApp, Facebook, YouTube सह अनेक अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही उपलब्ध आहे.
डिव्हाईसमध्ये कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
तुम्हाला या फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ आणि 3.5 mm ऑडिओ जॅकसह अनेक खास वैशिष्ट्ये देखील मिळतील.

 

Web Title :- Jio Phone Recharge Plan | jio phone recharge plan rs 1999 offer 2 year validity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..