Jitendra Awhad | सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, जितेंद्र आव्हाडांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र (Viceroy of Maharashtra) आहेत. व्हाईसरॉय कसा हातात कायदा असतानाही कोणाचेही ऐकत नव्हता, तसे हे व्हाईसरॉय आहेत, अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली. नवी मुंबईतील नेरुळ येथे आयोजित आगरी कोळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) बोलत होते.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांना वाटते अख्खे ठाणे त्यांच्या हातात असावे. पवारांनी ऐवढे वर्ष राजकारण केले संपूर्ण बारामती त्यांची होऊ शकली नाही, असा टोला त्यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य निवडणुकींना होणाऱ्या विलंबाबत टीका करताना आव्हाड म्हणाले, नवी मुंबईच्या निवडणुका येतील, नशीब मतदान पोलीस (Mumbai Police) करत नाहीत, एवढेच राहिले आहे आता, नाहीतर सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू अशा शब्दात त्यांनी टीका केली.

तीनचा वॉर्ड असावा, असे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री असताना नक्की झाले होते.
पंधराशे कोटी रुपये खर्च झालेत, आता म्हणतात चारचा वॉर्ड करा.
आपल्या घरचा पैसा जाणार नाही म्हणून काहीही करायचे का? कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order)
आमच्या हातात आहे, त्यामुळे आम्ही सांगू तो कायदा तो पोलिसांनी मानला पाहिजे,
अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात राबवला जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad comment on eknath shinde over thane in agri koli festival navi mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार