
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’
ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्रात 1999 पासून जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे, असे ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जे लोक 6 डिसेंबरला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन) आपल्या घरी थांबत नाहीत, ते आम्हाला जातीपातीचे राजकारण सांगत आहेत. त्यांनी सर्वप्रथम 6 डिसेंबरला कुठे असतात, ते जाहीररित्या सांगावे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले आहेत.
राज ठाकरे 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी आपल्या घरात थांबत नाहीत. त्यांनी आम्हाला जातीपाती शिकवू नये. तुम्ही 6 डिसेंबरच्या आधी आणि 6 डिसेंबरच्या नंतर कुठे असता, ते एकदा जाहीररित्या सांगा. उगाच राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर नको ते आरोप करू नका. आम्ही पूर्ण पुराव्यानिशी उत्तर देतो, असे आव्हाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा जन्म 1999 साली झाला. 2003 साली जेम्स लेन याने ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे घाणेरडे पुस्तक लिहिले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन याला माहिती पुरवली होती. त्या पुस्तकामध्ये माँसाहेब यांच्या चारित्र्याबद्दल आणि शहाजीराजांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेमध्ये अनेकांची नावे होती. या पुस्तकाबद्दल सगळ्यात पहिला आक्षेप घेणारा मी आणि सीपीआयचा कार्यकर्ता किशोर ढमाले हेच होतो. नंतर हा मुद्दा पेटला आणि अनेकांनी यात उड्या घेतल्या. त्यावेळी ठाकरे पुरंदरेंची बाजू घेऊन बोलत होते आणि आजही कौतुक करतात. त्यामुळे जातीवादी राष्ट्रवादी काँग्रेस, की राज ठाकरे हे तुम्ही पाहा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना देवत्व देऊ नका,
असे आमचे मत आहे. ते असामान्य लोक होते. त्यांचे कर्तृत्व, विचार असामान्य होते.
ज्या समाजात ज्या प्रतिकूल परिस्थितीत ते जन्माला आले, तिथली सगळी परिस्थिती बदलून टाकण्याचे काम
या महापुरुषांनी केले. त्यांच्यामुळे माझ्यासारखा भटक्या समाजातील मुलगा तुमच्यासमोर बसला आहे.
मी पाहिजे ते बोलू शकतो. ही सगळी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचीच विचारसरणी आहे आणि ती
महाराष्ट्राला कळली पाहिजे. अजूनही लोकांना वाटते की बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज
लोकांच्या घरोघरी पोहोचले. पण महाराष्ट्र अडाणी नाही. या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला जन्मताच
शिवाजी महाराज समजतो, असे आव्हाड यांनी यावेळी नमूद केले.
Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad slam raj thackeray over criticism ncp sharad pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update