Jitendra Awhad | ‘हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

ठाणे: पोलीसनामा ऑनलाइन – लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या मुंबईतील तरुणीचा दिल्लीत दुर्देवी अंत झाला. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि आंतरधर्मिय विवाह केलेल्या महिला, मुली सुखरूप आहेत की नाही, याची माहिती गोळा करण्याचे आदेश महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगाला दिले. त्यानुसार सरकारने आणि महिला आयोगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार आहे की, विवाह नोंदणी कार्यालय, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला हे सरकार 200 वर्षे मागे घेऊन चालले आहे. कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. सरकारला यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावे. महाराष्ट्र सरकारकडून जाती व्यवस्था म्हणजे ‘चातुरवर्ण व्यवस्था’ मजबूत करण्याचे काम चालू आहे. सदरच्या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधानविरोधी आणि मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की, आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय?, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, महिला आयोगाच्या एका कार्यक्रमात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची चर्चा झाली. वालकर हिच्यासारखी अनेक प्रकरणे राज्यात आणि देशात आहेत.
ज्या मुलींचे आणि महिलांचे आपल्या कुटुंबासोबत संबंध तुटतात. त्या आता दयनीय अवस्थेत असू शकतात.
त्यामुळे अशा महिला आणि मुलींच्या सुरक्षेची आणि भवितव्याची जबाबदारी शासनाची आहे.
त्यामुळे महिला आयोगाने अशा मुली आणि महिलांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे.
त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. त्यामुळे एक विशेष पथक स्थापन करून अशा मुली आणि
महिलांची माहिती शासनाकडे गोळा करावी. यातूनच आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad slams maharashtra government over intercaste marriages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shriya Pilgaonkar | श्रिया पिळगावकरची नवी वेब सिरीज चर्चेत; सिरीज मध्ये साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Pune Crime | प्रेमास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून कोयत्याने वार, फुरसुंगी परिसरातील घटना

SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ