Shriya Pilgaonkar | श्रिया पिळगावकरची नवी वेब सिरीज चर्चेत; सिरीज मध्ये साकारणार सेक्स वर्करची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : Shriya Pilgaonkar | मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर तिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘गिल्टी माइंड्स’ या वेब सिरीज मध्ये तिने एका वकिलाची भूमिका साकारली होती. तर ‘द ब्रोकन न्यूज’मध्ये एका न्यूज रिपोर्टरची भूमिका निभावली होती. आता श्रियाची नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी अगदी विरुद्ध भूमिका साकारणार आहे. ‘ताजा खबर’ या नव्या वेब सिरीजचे नाव असून ती या वेब सिरीज मध्ये एका सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहे. (Shriya Pilgaonkar)

ताजा खबर ही वेब सिरीज डिज्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. 6 जानेवारी 2023 ला या सिरीजचे सगळे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिरीज मध्ये श्रिया एक वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच श्रियाने या वेब सिरीजचा प्रोमो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या प्रोमो मध्ये श्रियाला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. (Shriya Pilgaonkar)

याआधी नुकतीच श्रिया तिच्या ऑस्ट्रेलिया ट्रिप मध्ये बिझी असल्याचे दिसून आले. तिने तेथील काही फोटोज आणि व्हिडिओज देखील शेअर केले होते. जे सोशल मीडियावर चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत होते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिने नमूद केले होते की याआधी तिच्या आजोबांसोबत ती ऑस्ट्रेलियाला गेली होती त्यानंतर आता अनेक वर्षांनी ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

Web Title :-  Shriya Pilgaonkar | shriya pilgaonkar play prostitute worker role in upcoming web series taaza khabar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ

Horoscope 2023 | राशिफळ 2023 : ‘या’ 6 राशींचे 2023 मध्ये बदलणार भाग्य, नोकरीमध्ये होईल जबरदस्त फायदा