Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ कारणामुळे केली घोषणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानंतर आता त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा रविवारी रात्री उशिरा मुंब्रा (Mumbra) येथे दाखल झाला आहे. मुंब्रा येथील वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात आव्हाड यांनी विनयभंग (Molestation Case) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jitendra Awhad) दरम्यान, या नंतर आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्याने बघू शकत नाही असे ते म्हणाले.

हर हर महादेव चित्रपटावरुन (Har Har Mahadev Marathi Movie) जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० जणांवर
गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने त्यांची दुसर्‍या दिवशी जामिनावर सुटका करण्यात आली होती.
त्यानंतर आता ७२ तासात पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jitendra Awhad)

भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रिदा अजगर रशिद यांनी तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,
मुख्यमंत्री जात असताना त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या होतो.
त्यावेळी आव्हाड यांनी खांदा दाबून मध्ये काय उभी आहे, चल बाजूला हो,
असे बोलून विनयभंग केल्याची तक्रार रशिद यांनी केली आहे.
त्यांच्या तक्रारीवरुन आव्हाड यांच्या विरोधात कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :-  Jitendra Awhad | ncp leader jitendra awhad going to give resignation of mla post after molestation case registered mumbra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला