MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

पोलीसनामा ऑनलाईन : खासदार गजानन कीर्तिकरांनी (Gajanan Kirtikar) उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) सोडून नुकताच शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर उद्धव गटातून शिंदे गटात जाणारे तेरावे खासदार आहेत. त्यांनी हा निर्णय घ्यायला इतर खासदारांपेक्षा जास्त वेळ लावला. त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून जाण्याचे खापर राष्ट्रवादीच्या (NCP) डोक्यावर फोडले. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) कीर्तिकरांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे. शेवटी राष्ट्रवादीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) गजानन कीर्तिकरांना टोला लगावला आहे.

 

शिवसेनेत झालेल्या सर्व घडामोडींसाठी गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यावर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंनी गजानन कीर्तिकरांना टोला लगावला, “राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय बातमी कशी होणार? हे नाणं चालतंय मार्केटमध्ये. ठीक आहे. किर्तीकर हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक राहिले आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण शेवटी राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही ना.”

 

तसेच, राज्यातून सध्या बाहेर जात असलेल्या प्रकल्पांवरूनही त्यांनी राज्य सरकारला (State Government) लक्ष्य केलं आहे.
ऊर्जा उपकरणांचा एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारची टीका केली
जात असताना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प बाहेर गेल्याचा स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले होते.
त्यावर उत्तर देताना ही जो सरकारमध्ये बसलेला असतो, त्याच्यावरच जबाबदारी असते, असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या.

 

Web Title :- MP Supriya Sule | ‘… Without it, it doesn’t make news, does it?’; Supriya Sule’s tribute to Gajanan Kirtikar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’