Jitendra Awhad | “भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही…”; मनसेचा आव्हाडांना सल्ला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) नेतृत्वात ठाणे जिल्ह्यातील विवियाना (Viviana) नावाच्या मॉलमधील ‘हर हर महादेव’(Har Har Mahadev) या चित्रपटाचा शो ७ नोव्हेंबर रोजी बंद पाडला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

यावरती आता मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचं आहे. कायद्याने कायद्याचं काम केलं पाहिजे. आव्हाड यांनी जामीन न घेण्याची नाटके करून, भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही. त्यांनी प्रेक्षकाला मारताना जगाने पाहिलं आहे, त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने केली नाही. यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. पोलिसांना आम्हीच कारवाई करण्याची मागणी केली होती”.

माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांनी ‘हर हर महादेव’
आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांचा विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड
हे देखील आक्रमक झाले होते. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ( ७ नोव्हेंबर ) रात्री ११ वाजता ठाणे जिल्ह्यात आंदोलन केले होते. प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक त्यांनी बाहेर हुसकावून लावले होते.

Web Title :-  Jitendra Awhad | “No need for emotional blackmail…”; MNS’s advice to Ahwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update