Jitendra Awhad On Ajit Pawar | अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या, आता सांगाव्या लागतील, आव्हाडांची टीका, ”त्यांना हिंदी…”

मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar | अजित पवार यांच्रूावर भाषणाची वेळ आली की मंचावरून पळून जायचे. दिल्लीत भाषणाची वेळ आली की नेमके बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी येत नाही. अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला त्या लोकांना सांगाव्या लागतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. (Jitendra Awhad On Ajit Pawar)

आज बारामती येथील सभेत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली, या टीकेनंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. संसदेत भाषणं देऊन आणि सेल्फी काढून काहीही होत नसतं, अशी टीका अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. यानंतर आव्हाडांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जेव्हा जेव्हा त्यांची दिल्लीत भाषण करायची वेळ यायची तेव्हा तेव्हा ते बाथरुममध्ये असायचे. कारण भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. यांचा पीए यांना भाषण लिहून द्यायचा मग ते भाषण बोलून दाखवायचे.

आव्हाड म्हणाले, शरद पवारांची लोकप्रियता जेव्हा हिमालयाएवढी होती. तेव्हा अजित पवार खालून पिन मारून पंक्चर करायचे. कधी राजीनामा द्यायचे, तर कधी वादग्रस्त, विचित्र वक्तव्य करायचे. विरोधी बाकावर येऊन भाषण करायचे, काय भाषण करायचे? पीए भाषण लिहून द्यायचा. त्यात पण विरोधी पक्षावरची महत्त्वाची टीका बाजूला काढायचे.

विरोधी पक्ष म्हणजे तेव्हाचा सत्ताधारी पक्ष. सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षनेते होता तुम्ही, परंतु, तुम्ही विरोधी पक्षाचे विरोधक असल्यासारखी वक्तव्ये करायचात. सत्ताधाऱ्यांच्या टीपांवर वागणारा विरोधी पक्षनेता म्हणजे अजित पवार, असा घणाघात आव्हाड यांनी केला.

अजित पवारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही शरद पवारांच्या रक्ताचे नसलात तरी तुम्ही नेहमीच त्यांच्या
रक्तात होता. म्हणूनच त्यांनी तुम्हाला मंत्रिमंडळात इतकी महत्त्वाची खाती दिली. त्या प्रेमापोटीच तुम्ही इतकी
मंत्रिपदं भूषवली. तुमची वादग्रस्त वक्तव्ये, तुमच्या चुका या नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी घातक होत्या.

आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी तुमच्या चुका पाठीशी घातल्या, तीच त्यांची मोठी चूक होती.
तुम्ही कुठे काय बोललात, धरणात * गेलात वगैरे वक्तव्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत.
परंतु, याच चुका जितेंद्र आव्हाडने किंवा इतर नेत्याने केल्या असत्या तर शरद पवारांनी त्याला पक्षात ठेवले असते का?
असा सवाल आव्हाड यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)