Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | आगामी लोकसभेची आचारसंहिता आणि आर्थिक वर्षाचा शेवट या पार्श्‍वभूमीवर कामाच्या वर्क ऑर्डर २० ते २५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. मात्र, ही मुदत ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली.

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते. दरवर्षी साधारण २५ मार्चपर्यंत कामाच्या अथवा खरेदीच्या वर्क ऑर्डर दिल्या जातात. जेणेकरून आर्थीक वर्ष संपण्यापुर्वी संबधीत ठेकेदारांना बिले महापालिकेकडे सादर करण्यास अवधी मिळतो. परंतू यंदा लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. मार्चमध्ये केव्हांही निवडणुका जाहीर होउन कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तीन आठवड्यांपुर्वी सर्व विभागांना २० ते २५ फेब्रुवारी पर्यंत सर्व कामांच्या वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले होते. यामुळे मागील तीन आठवड्यांमध्ये सर्वच विभागांनी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अवघ्या दोन आठवड्यांत स्थायी समितीने तब्बल ४४१ निविदांना मंजुरी दिली. तसेच काही निविदा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर केल्यानंतर सर्व खातेप्रमुखांना दिलासा मिळाला आहे. येत्याकाळात आणखी निविदा मंजुर करून वर्क ऑर्डर देता येउ शकणार आहेत. विशेष असे की पावसाळी कामे आचारसंहितेत अडकू नयेत यासाठी त्या कामांच्या निविदाही मागविण्यात आल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभेच्या तयारीला सुरुवात; लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Manoj Jarange Patil | जरांगेंनी नारायण राणेंना खडसावलं, ”वयाचा आदर करत होतो…आता मी पाणउतारा करेन”