NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

बारामती : NCP Leader Ajit Pawar | आमच्या घरातील शरद पवार (Sharad Pawar) हे एकमेव वरिष्ठ आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या घरातले बाकीचे सगळे माझ्या विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना आवाहन करताना केले.

दरम्यान, या वक्तव्यावरून अशीही चर्चा सुरू झाली आहे की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये जी बंडखोरी केली, तिला पवार कुटुंबातून देखील समर्थन मिळालेले नाही, म्हणूनच त्यांनी मला निवडणुकीत एकटे पाडले जाईल, असे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

तसेच यावेळी अजित पवार यांनी बारामतीचा लोकसभेचा उमेदवार हा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याचेही सुतोवाच केले असल्याने अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, या सभेत अजित पवार पुढे म्हणाले, आतापर्यंत जे खासदार तीन-चार वेळा निवडून गेले होते, त्यापेक्षा आपला खासदार नवखा असून पहिल्यांदाच निवडून जाणार आहे. पण हा खासदार जास्त कामं करेल, हा अजित पवारचा शब्द आहे. काही लोक म्हणतील की, खासदार पहिल्यांदाच निवडून जात आहे, तर काम कसं करेल? तर त्याबाबत तुम्ही निश्चिंत रहा. खासदाराच्या बाजूला असलेली आमच्यासारखी लोकं अनुभवी आहेत.

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, आपल्याला बारामतीचा,
महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची,
यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता
तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात.

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील.
पण भावनिक होऊन भाकरीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होतं नाहीत. कामं तडफेने करावी लागतात.
ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. बारामतीकरांनी मला याआधी विक्रमी मतांनी निवडून दिले आहे.
त्याचप्रमाणे आमच्या लोकसभेच्या खासदारालाही विक्रमी मतांनी निवडून द्या.

अजित पवार म्हणाले, इंदापूर, भोर, दौंड, वेल्हा, मुळशी, खडकवासला, पुरंदर येथेही मी भूमिका मांडणार आहे.
पण बारामतीमधील कार्यकत्र्यांनी प्रत्येक बुथवर जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडायची आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | चव्हाणांमुळे नारायण राणेंना राजकीय संधीने दोन वेळा दिली हुलकावणी, अशोक चव्हाण म्हणाले, ”माझं येणं आणि…”

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना