Coronavirus : 3 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, राष्ट्रवादी नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना झाल्याच्या अनेक वावड्या उडाल्या होत्या. आता मात्र, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाने तीन दिवसांपुर्वी आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह होते असा गंभीर खुलासा केला आहे. ठाणे मनपा राष्ट्रवादी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी हा खुलासा केला असल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ’तीन दिवसांपूर्वीच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांत उपचार करून त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणार्‍या सर्व 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती करू शकत नाहीये. याची आम्हालाही खंत आहे.’ असेही पाटील म्हणाले. ’आव्हाडांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. म्हणून आमचीही चाचणी करून आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण हा संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी दुर्दैवाने आम्हाला हे काम थांबवावे लागेल’

होम क्वारन्टाईन झाल्यानंतर काय बोलले जितेंद्र आव्हाड
’सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉलनुसार मला आता किमान 14 दिवस होम क्वारन्टाईन व्हावे लागणार आहे. जी की अत्यावश्यक बाब आहे,’ अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या संपर्कात आले. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाईन करून घेतले आहे.