Jiya Shankar | ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकर हिने तरुणांना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Jiya Shankar | अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. 30 डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. ‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण 44.92 कोटींचा गल्ला जमवला असून आता याची 50 कोटीकडे घोडदौड सुरू आहे. (Jiya Shankar)

 

“वेड” या चित्रपटात रितेश आणि जिनिलीया यांच्याबरोबरच अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) हीचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘वेड’ या चित्रपटातून तिला मराठी सिनेसृष्टीत मोठा ब्रेक मिळाला आहे. तिची भूमिकासुद्धा प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. नुकतंच जियाने रितेश आणि जिनिलीया या जोडप्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टींचा खुलासा केला.

याबद्दल जिया म्हणाली, “ते दोघे पडद्यावर किंवा सोशल मीडियावर जसे दिसतात तसेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा तसेच आहेत. ते दोघेही मोहक आहेत.
आणि ते जेव्हा एकत्र असतात तेव्हा ते जास्त सुंदर दिसतात. दोन दशकं उलटली तरी त्यांच्यातील प्रेम जरासुद्धा कमी झालेलं नाही.
त्यांच्याकडे पाहून आजच्या पिढीने नातं कसं जपावं हे शिकायला हवं.
“मी आधीही हे सांगितलंय आणि आताही हे सांगते कि लोकांनी रितेशकडून शिकण्यासारखं आहे कि एका पुरुषाने आपल्या जोडीदाराला कशी वागणूक द्यावी.
रितेश सर कोणत्याही महिलेला सेटवर ज्याप्रकारची वागणूक देतात तशी कुठेच मिळत नाही. त्याच्या सेटवर सगळेच प्रचंड खुष असतात.”

याबरोबरच जियाने (Jiya Shankar) चित्रपटसृष्टीतील काम करण्याच्या अनुभवाबद्दलसुद्धा सांगितलं.
ती म्हणाली, “मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण मी असे बरेच स्वार्थी नट पाहिले आहेत
जे कायम स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात.
त्यांना फक्त त्यांच्या कामाची पर्वा असते. समोरची व्यक्ती काय करतीये याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं.
एखादा सीन करताना माझी जागा घ्यायचा कुणी प्रयत्न केला तर मी तसं होऊ देत नाही.”
याचबरोबर जियाने 2013 मध्ये अजय मंथेना सोबत ‘एंठा आंदंगा उन्नावे’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
नंतर 2017 मध्ये ती अरुण चिंदबरमसोबत ‘कनावू वरियाम’ या तामिळ चित्रपटात झळकली होती.

 

Web Title :- Jiya Shankar | ved fame actress jiya shankar speaks about riteish deshmukh and genelia deshmukh bonding

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neha Mahajan | नेहा महाजनच्या ट्रेडिशनल लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Rashami Desai | रश्मी देसाईच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…