आई-वडीलांना भेटण्यासाठी गेलेल्या CID अधिकाऱ्याची हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्था-अतिरेकी गेल्या काही महिन्यांत पोलिसांना लक्ष्य करत आहेत. गेल्या महिन्यात दोन विशेष पोलीस अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. आज (रविवार) सायंकाळी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका सीआयडी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. अतिरेक्यांनी इम्तियाज अहमद मीर या सीआयडी अधिकाऱ्यावर गोळ्या घालून ठार केले.

ही घटना पुलवामा जिल्ह्यात वाहिबाग येथे आज सायंकाळी घडली. इम्तियाज मीर हे आपल्या आई-वडीलांना भेटण्यासाठी गेले होते. अतिरेक्यांना ओळखू येऊ नये यासाठी त्यांनी दाढी काढून आपला चेहरा बदलून अतिरेक्यांना चकवा देत गावात जाण्याचा प्रयत्न केला,  मात्र, अतिरेक्यांनी त्यांना गाठून ठार केले.

जम्मू-काश्मीरमधील सीआयडी अधिकारी इम्तियाज अहमद मीर यांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केलं. पुलवामा जिल्ह्यात वाहिबाग येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी अधीर असलेले मीर यांनी दाढी काढून आपला चेहरा बदलून अतिरेक्यांना चकवा देत गावात जाण्याचा प्रयत्न केला, पण अतिरेक्यांनी त्यांना गाठलेच.

मीर (३०) सीआयडी विभागात होते. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांना देण्यात आला होता. याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांने सांगितले, ‘मी त्यांना जाऊ नको, असे सांगितले होते. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. पण त्यांना पुलवामा जिल्ह्यातील त्यांच्या गावी सोंताबाग इथे राहात असलेल्या आई-वडिलांना भेटायचे होते.’

आज सकाळी मीर यांनी त्यांच्या घरी जाण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी दाढी काढून आपला लुक बदलण्याचा प्रयत्न केला आणि खासगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ‘आता ते (अतिरेकी) मला ओळखू शकणार नाहीत,’ असं मीर म्हणाले. कदाचित ते त्यांचे अखेरचे शब्द होते, असे त्यांची सहकारी सांगतात. खूप दिवसांनी आई-वडिलांना भेटायला जायचं म्हणून मीर खूप आनंदात होते.

त्यांचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. मीर २०१० च्या बॅचचे पोलीस उप निरीभक होते. दक्षिण काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात पाच वर्ष सेवा दिल्यानंतर गेल्या वर्षी त्यांची कुलगाममध्ये बदली झाली होती. यावर्षी मार्चमध्ये ते सीआयडी विभागात आले.