Job Alert : पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका अन्य आरोग्य सेवक सगळ्यांचीच कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. तसेच राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करत आहे. मुंबईत रुग्णसंख्या जास्त असल्याने त्याठिकाणी आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणेतील 185 पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यात फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.

कोण अर्ज करू शकत?

विविध पदासाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची बी.एससी पदवी असावी. फार्मासिस्ट पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची बी.फार्म पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावे. फॉर्म जाहीर होण्याच्या तारखेपासून वयोमर्यादा ग्राह्य धरली जाणार आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथिलक्षम असेल.

रिक्त पदे

185 जागांवर भरती करण्यात येणार असून, यात प्रयोगशाळा तंत्रज्ञपदाच्या 89 जागा, फार्मसिस्टसाठी 96 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या दोन्ही पदांसाठी दरमहा 18 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.