सुवर्णसंधी ! 10 वी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात परीक्षा न देता थेट भरती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय डाक विभागात तरुणांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. तर जे १० वी उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी (Gramin Dak Sevak) ही भरती राबवली आहे. इच्छूक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. एकूण ११३७ पदांची भरती होणार आहे. महत्वाचे म्हणजे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तर ही भरती छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये (Chhattisgarh Postal Circle) केली जाणार आहे. अशा भरतीसंदर्भात सूचना टपाल खात्याने दिले आहे.

वेतन –
१०,००० ते १२,००० याव्यतिरिक्त केंद्र सरकारचे इतर भत्तेही मिळणार

शैक्षणिक पात्रता –
देशातील कोणत्याही शिक्षण मंडळाचे १० वी उत्तीर्ण असावे. १० वीच्या गुणांद्वारे गुणवत्ता यादी जारी होणार आहे. १० वी मध्ये गणित, इंग्रजी आणि स्थानिक भाषा असणे. संगणकाचे मूलभूत ज्ञान असने. यासाठी कोणत्याही शासकीय किंवा खासगी संस्थांकडून किमान ६० दिवस संगणक प्रशिक्षण कोर्स असणे बंधनकारक.

वयाची अट –
किमान वय १८ तर कमाल ४० वर्षे. ही भरती छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये (Chhattisgarh Postal Circle) केली जाईल.

असा करा अर्ज –
भारतीय टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू – ८ मार्च २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२१

अर्ज करण्यासाठी फी –
सर्वसाधारण उमेदवारांना १०० रुपये. SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

-अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक ही अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.