Job IBPS Clerk Notification 2021 | नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी सुवर्णसंधी, ‘या’ बँकांमध्ये बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Job IBPS Clerk Notification 2021 | राष्ट्रीयकृत सरकारी बँकांमध्ये क्लर्कच्या सरकारी नोकरीची इच्छा असणार्‍यांनी किंवा बँक क्लर्क भरती 2021 (Job IBPS Clerk)  ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) , युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), बँक ऑफ इंडिया (Bank of India), कॅनरा बँक (Canara Bank) आणि इतर बँकांमध्ये क्लेरिकल कॅडरच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

संस्थेद्वारे रविवार 11 जुलै 2021 ला जारी आयबीपीएस क्लर्क (CRP Clerk-XI 2022-23) अधिसूचनेनुसार यावर्षी एकुण 5858 पदांसाठी उमेदवारांची कॉमन रिक्रूटमें प्रोसेस (CRP) द्वारे निवड करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आयबीपीएसने क्लेरिकल कॅडरच्या 1558 रिक्त पदे घोषित केली होती.

आजपासून करा अर्ज

आयबीपीएस क्लर्क (CRP Clerk-XI 2022-23) अधिसूचनेनुसार बँकांमध्ये 5858 क्लर्क पदांसाठी अर्ज आज, 12 जुलै 2021 पासून केले जाऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021 आहे. सोबतच उमेदवारांना अर्ज शुल्क 850 रुपये आजपासून 1 ऑगस्टच्या दरम्यान भरावे लागेल. दुसरीकडे, आयबीपीएस क्लर्क XI भरती कार्यक्रमानुसार प्रारंभिक परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन 16 ऑगस्टला केले जाईल, तर, प्रारंभिक परीक्षा 28 आणि 29 ऑगस्टला आणि नंतर 4 सप्टेंबरला आयोजित होईल. यानंतर मुख्य परीक्षा 31 ऑक्ओबर 2021 ला आयोजित केली जाणार आहे.

असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयबीपीएस क्लर्क भरती 2021 साठी आयबीपीएसचे अ‍ॅप्लीकेशन पोर्टल, ibpsonline.ibps.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. उमेदवारांनी अ‍ॅप्लीकेशन पोर्टलवर व्हिजिट केल्यानंतर सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. यानंतर, रजिस्ट्रेशनसाठी नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची माहिती भरावी. यानंतर दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डद्वारे लॉगइन करून उमेदवार आपले आयबीपीएस क्लर्क 2021 ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशन सबमिट करू शकतील.

येथे पहा भरतीची अधिसूचना
https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRP-Clerks-XI_2121.pdf

येथे करा अर्ज –

स्टेप 1 रजिस्ट्रेशनसाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/

स्टेप 2 अ‍ॅप्लीकेशनसाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/basic_details.php

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : job ibps clerk notification 2021 released for 5858 vacancies online registration from today at ibps

हे देखील वाचा

Pune Crime | रघुनाथ येमूलच्या दरबारात राजकीय दिग्गज, प्रशासकीय अधिकारी लावतात हजेरी; गुरुजींच्या अटकेनंतर प्रचंड खळबळ

Today’s petrol price in Pune | जुलै महिन्यात 7 व्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ, प्रथमच डिझेलच्या दरात झाली कपात