‘इंडियन ऑइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) नॉन-एग्जिक्युटिव्ह पदासाठी ४७ जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज दाखल करावा. अर्ज करण्याबाबत १५ जानेवारी २०२१ ही अंतिम मुदत असेल.

इंडियन ऑइल कंपनीतील या जागा पाईपलाईन डीव्हिजनमधील असून, वेगवगेळ्या ठिकाणांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती आणि नियमांचे वाचन करणे गरजेचे असून अतिशय अचूक रित्या अर्ज भरावयाचा आहे. अन्यथा तुमचा अर्ज रद्दबातल ठरु शकतो.

शैक्षणिक पात्रता काय असावी ?
यासाठी कोणत्याही विषयातील इंजिननिअरिंगचे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. त्याशिवाय उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये आणि २२ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराचे वय २६ वर्षापेक्षा अधिक असता कामा नये. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांमध्ये सवलत दिली आहे.

अर्ज शुल्क किती ?
भरतीच्या अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी सवलत देण्यात आली आहे. फक्त ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज दाखल करता येणार आहे. अधिक माहितीसाठी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

अशी करण्यात येईल निवड
लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड होईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अंतिम यादी सादर करण्यात येईल, मग पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.