बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रीया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीसाठी jobs संधीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या एकूण 1850 ते 2070 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून 26 जून 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी [email protected]/ [email protected] या मेलवर अर्ज करावा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

या पदासाठी होणार भरती
1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट (MD Medicine) अटेस्टंट (एमडी) नेफ्रोलॉजिस्ट, ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट या पदांसाठी 50-70 जागा
2) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी 900 ते 1000
3) अधिपरिचारिका या पदासाठी 900 ते 1000 जागा

1) शैक्षणिक पात्रता
पद क्र 1 – वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा.
उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा

पद क्र. 2 – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा(आयुर्वेद व होमिओपविक) नोंदणीकृत असावा.

पद क्र 3 – अधिपरिचारिका :
जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक असावा. तसेच योग्य त्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा. वयोमर्यादा – 9 जून 2021 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 33 वर्षापेक्षा अधिक असू नये.

2) मानधन – वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – दीड लाख ते 2 लाख, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 50 हजार ते 80 हजार आणि प्रशिक्षित अधिपरिचारिका – 30 हजार रुपये

3) नोकरीचे jobs ठिकाण – मुंबई

4) अर्ज करण्याची शेवटची मुदत – 26 जून 2021

5) अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

Pankaja Munde | पंकजा मुंडेंचे CM ठाकरेंना पत्र, म्हणाल्या – ‘125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नका’

सर्वसाधारण अटी
1)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवारास विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करता येईल.

2) उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवारविरुद्ध पोलीस चौकशी, न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवशयक आहे.

3) निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती, चुकीची प्रमाण कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी रद्द होईल.

4) उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियोक्त्यांचे ना- हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

5) प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्पावर थांबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत.

6) उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

7) कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने 30 दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.

Wab Title : jobs recruitment 1850 2070 posts mumbai municipal corporation apply online till june 26

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

pune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा तलाठी अन् खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Coronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल दुष्परिणाम; WHO आणि AIIMS ने केला सर्वे, जाणून घ्या निष्कर्ष