नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

वाकड : पोलिसनामा ऑनलाईन

पार्लरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १६ वर्षीय अप्लवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. आता या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द पार्लरचा मालकच आहे. सराफत बरकतअली खान (२४, रा. दत्तनगर वाकड, मूळ उत्तर प्रदेश) असे या पार्लर चालकाचे नाव आहे़ पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री खानला वाकड येथून अटक करण्यात आली.

वाकड येथे त्याचे ताज मेकओव्हर युनिसेट सलून जेन्ट्स आणि लेडीज् ब्यूटी पार्लर आहे. पार्लरमध्ये कामावर आलेल्या पीडितेवर पहिल्याच दिवशी खान याने अत्याचार केले. तसेच त्याचे मोबाइल चित्रिकरण करीत, ते व्हायरल करण्याची धमकी देत तो दुसऱ्या दिवशीही तिला पार्लरमध्ये बोलावत होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेली पीडिता दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. ती सापडल्यानंतर तिने व तिच्या आई, वडील, बहिणीने घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला.