John Abraham | जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, हॅकर्सनी हटवल्या सर्व पोस्ट आणि डीपीसुद्धा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – John Abraham | बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे (John Abraham) इन्स्टाग्राम अकाउंट हॅक (Instagram Hack) करण्यात आले आहे. त्याच्या डीपीशिवाय, हॅकर्सनी सोशल मीडियावरील सर्व पोस्ट देखील हटवल्या आहेत, ज्यानंतर जॉनचे चाहते खूप नाराज होऊ शकतात.
जॉन अब्राहम (John Abraham) सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, पण चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता अभिनेत्याच्या पोस्टमधील सर्व फोटो अशाच डिलीट होतात.
जॉन अब्राहम भलेही सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसला तरी तो
जेव्हाही त्याचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो
तेव्हा त्याचे चाहते त्याला खूप पसंत करतात. अशा परिस्थितीत
त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे खाते हॅक होणे चाहत्यांसाठी दुःखा पेक्षा कमी नाही.
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर जॉन नुकताच प्रदर्शित झालेल्या
‘सत्यमेव जयते 2’ (Satymev Jayate-2) या चित्रपटात दिसला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी (Milap Zaveri) यांनी केले होते.
अभिनेता जॉन अब्राहमने अनेक चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.
या चित्रपटांमध्ये विकी डोनर, दोस्ताना, बाबुल, गरम मसाला, धूम,
पाप आणि जिस्म या चित्रपटांचा समावेश आहे.
Web Title :- John Abraham | john abraham instagram account hack hackers deleted dp and all posts
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Akshara Singh | अक्षरा सिंहचा ब्लाऊज पाहून लोकांचे उडाले ‘होश’
Types Of Tax Notices | तुम्हाला पण आली आहे का Income Tax ची नोटिस? जाणून घ्या कसे देता येईल उत्तर