Video : जॉनी लिव्हर यांच्या मुलीने केली कंगनाची ‘मिमिक्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सोशल मीडियावर जॅमी लिव्हर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची जॅमी लिव्हर ही कन्या आहे. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जॅमीने अभिनेत्री कंगना रणौतसह इतरही काही अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.

जॅमी या व्हिडीओमध्ये कंगना रणौत, सोनम कपूर, करीना कपूर खान, फराह खान आणि आशा भोसले यांची मिमिक्री करत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये जॅमी करोना लसीवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ ३६ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. जॅमीचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर ती सतत व्हिडीओ शेअर करताना दिसते. जवळपास २ लाखा पेक्षा जास्त लोकांनी जॅमीचे हे यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब केले आहे. जॅमीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे.