Journalist Ashish Chandorkar | ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन

पुणे : Journalist Ashish Chandorkar | ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (ashish chandorkar) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. ते यावेळी 44 वर्षांचे होते. त्यांच्या माघारी एक बहिण व कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी  5 वाजता वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Journalist Ashish Chandorkar)

आशिष चांदोरकर यांची कारकीर्द

आशिष चांदोरकर यांनी पुण्यात प्रभात या वृत्तपत्रातून आपल्या पत्रतारिकेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केसरी, ईटीव्ही मराठी, सामना, सकाळ, साममध्ये  देखील आपली पत्रकारिता केली.  महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी तब्बल 9 वर्ष काम केले. यादरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कारकिर्दीवर मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र (Man of Mission Maharashtra) या पुस्तकाचे लेखनसुद्धा केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून शोक व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही आशिष चांदोरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आशिष चांदोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राजकीय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यसंस्कृती संदर्भात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे आज निधन झाले.
चांदोरकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Web Title :- Journalist Ashish Chandorkar | veteran journalist ashish chandorkar passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारची खेळी आणि महापालिका प्रशासनाची चालढकल, अखेर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

Face Glow | रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा ही वस्तू, मुरुम-फुटकुळ्या होतील दूर; चेहर्‍यावर येईल ‘नॅचरल ग्लो’

Benifits Of Drinking Coffee | ‘कॉफी लव्हर्स’साठी आली अशी खुशखबर; जाणून व्हाल खुश!