ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

आपल्या धारधार लेखणीने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते. नय्यर यांना २०१५ मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशातील विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते.

[amazon_link asins=’8192910962,9312147307′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a6e5623-a68a-11e8-9689-a30a8df638d7′]

कुलदीप नय्यर यांचा १४ आॅगस्ट १९२३ रोजी आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे झाला. त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला एका उर्दू वृत्तपत्रातून सुरुवात केली. ते दिल्लीतील द स्टेट्समैन चे संपादक होते.

डेक्कन हेरॉल्ड(बेंगलुरु), द डेली स्टार, द संडे गार्जियन, द न्यूज, द स्टेट्समैन, द एक्सप्रेस ट्रिब्युन पाकिस्तान, डॉन पाकिस्तान, प्रभासाक्षी यासह देशापरदेशातील १४ भाषांमधील ८० हून अधिक वृत्तपत्रात त्यांनी सदर लिहिली आहेत. १९८५ पासून त्यांचा दर रविवारी लिहिला जाणारे सदर जगभरातील वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असे.

१९९० मध्ये त्यांची इंग्लडचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १९९६ मध्ये ते संयुक्त राष्टाचे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते. १९९७ मध्ये त्यांची राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आणीबाणीच्या काळात नय्यर यांनी उठविलेल्या आवाजामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि शांतीदूत म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले.

त्यांचे बिटवीन द लाइन्स, डिस्टेंट नेवर : ए टेल आॅफ द सब काँटीनेंट, इंडिया आफ्टर नेहरु, वाल एट वाघा, इंडिया, पाकिस्तान रिलेशनशिप, इंडिया हाऊस, स्कुप ही इंग्रजी पुस्तके लिहिली़ त्याशिवाय द डे लुक्स ओल्ड या नय्यर यांच्या आत्मचरित्राची खूप चर्चा झाली होती.

त्यांना नॉथवेस्ट युनिर्व्हसिटी तर्फे एल्युमिनी मेरिट अवॉर्ड (१९९९)ने सन्मानित करण्यात आले होते. सरहद्द संस्थेच्या वतीने २०१४ मध्ये पुण्यात त्यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. रामनाथ गोएंका स्मृति पुरस्काराने त्यांना २०१५ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

[amazon_link asins=’B07DCVDLVX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78b73e6f-a68b-11e8-99db-df47d9a158c6′]

त्यांच्या लिखाणावरुन अनेक विवादही निर्माण झाले होते़ धर्मनिपेक्ष होण्याबरोबरच त्यांना हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांच्यावर होत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक असलेल्यांना कोणत्याही उच्च पदासाठी अयोग्य ठरविण्याचा कायदा पंतप्रधान वाजपेयी यांनी केला पाहिजे असे त्यांनी एकदा लिहिले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर त्यांनी टिका केली होती. अण्णा यांचे आंदोलन चांगले असले तरी त्यांनी त्यापासून उपोषणाला वेगळे ठेवले पाहिजे होते, असे म्हटले होते.