पत्रकार सुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून- जम्मू पोलिसांचा दावा

जम्मूः वृत्तसंस्था-

येथील द राझझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याचा दावा जम्मू पोलिसांनी केला आहे. याबाबतचे काही धागेदोरे हाती लागले असल्याचेही पोलिसांनी म्हटलं आहे. बुखारी यांची हत्या करण्याचे सिमेपलिकडून म्हणजेच पाकिस्तानातून आदेश होते. जमात-ए-इस्लामी आणि काही कट्टरपंथियांनी या अतिरेक्यांनी माथी भडकवली आणि त्यांना सुजात बुखारी यांची माहिती पुरवून हत्या करण्यास सांगितले. असे  या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे, याबाबत हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. बुखारी यांची हत्या करणाऱ्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू आणि कठोर कारवाई करू असेही पोलिसांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9ad8f8a-7858-11e8-91f5-095462fe7458′]

तसेच शुजात बुखारी यांचे जवळचे समजले जाणारे पाकिस्तानमधील पत्रकार तथा आंदोलक मोहम्मद यांची फेसबुक पोस्टही पोलिसांनी तपासली असून, त्यामध्ये मोहम्मद दुबई येथील शांतता परिषदेला हजर राहणार होते. मात्र ही शांतता परिषद काही कट्टरपंथीयांसाठी डोकेदुखी ठरली होती अशीही माहिती समोर आली. शुजात बुखारी हे भारताचे पेड एजंट होते असा आरोप हिजबुल मुजाहिद्दीनच्या सईद सल्लाऊद्दीनने केल्याचेही समजते आहे. यामुळे एकंदर या सर्व घडामोडी जर पाहिल्या तर या सर्व घटनांची साखळी जोडता येते का यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

पहा नेमके कोण होते शुजात बुखारी?

रायझिंग काश्मीरचे संपाद म्हणून सुजात बुखारी काम पाहत होते.

14 जूनला त्यांची अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मीरच्या शांतता प्रक्रियेसाठी सुजात बुखारी नेहमीच पुढे असायचे

बुखारी यांनी मनिलातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले

बुखारी यांना वर्ल्ड प्रेस इन्स्टिट्यूट फेलोशिप, अमेरिका आणि एशियन सेंटर फॉर जर्नालिझम, सिंगापूरची फेलोशिप मिळाली होती.

केंद्र सरकारने जाहिर केलेल्या शस्त्रसंधीचेही त्यांनी स्वागत केले होते.