Video : ‘जजमेंटल है क्या’ ?, ट्रेलर रिलीज ; युजर्स म्हणाले, ‘ही’ जोडी ‘सुपरहिट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौत आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणारा जजमेंटल है क्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर सस्पेंस, थ्रिलर आणि रोमँसने भरपूर आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि कंगनाची जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. हा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कन्फ्युनजनने भरेलेला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

या सिनेमात राजकुमार रावने केशवची तर कंगनाने बॉबीची भूमिका साकारली आहे. लोकांनी सोशलवर दोघांच्याही भूमिकेची तुलना करायला सुरुवात केली आहे. लोकांच्या मनात उत्सुकता वाढत आहे की, बॉबी आणि केशवमध्ये शेवटी कोण जिंकेल. प्रेक्षकांना कंगनाचा लुक आवडला आहे. राजकुमारची अॅक्टींग चाहत्यांना भावताना दिसत आहे. या सिनेमात सतीश कौशिकही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर पाहून लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत की, हा सिनेमा सुपरहिट ठरणार आहे.

सिनेमाच्या स्टोरीबाबत सांगायचे झाले तर, ही स्टोरी एका डबल मर्डरबाबत आहे ज्यामुळे पोलिसही खूप गोंधळलेले आहेत. खूप तापस केल्यानंतर पोलिसांना असे वाटते का मर्डर कंगना म्हणजे बॉबी किंवा राजकुमार राव म्हणजेच केशवने केला आहे. कोणीतरी एकाने हा मर्डर केला आहे असा पोलिसांचा संशय आहे. कंगनाचा लुकही खूप रंजक दाखवण्यात आला आहे.

हा सिनेमा 26 जुलै रोजी रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचं आणि कृती सेनन व दिलजीत दोसांझचा सिनेमा अर्जुन पटियाला या सिनेमाचं क्लॅश होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केलं आहे तर स्टोरी कनिका ढिल्लो यांनी लिहीली आहे. आधी या सिनेमाचं नाव मेंटल ‘है क्या’ असं होतं परंतु नावाला घेऊन वाद झाल्यानंतर या सिनेमाचं नाव ‘जजमेंटल है क्या’ असं केलं आहे. क्वीन नंतर ही दुसरी वेळ आहे की, राजकुमार राव आणि कंगना एकत्र दिसणार आहेत.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे