Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 5G नेटवर्कला विरोध करणारी एक याचिका अभिनेत्री जूही चावलाने (Juhi Chawla) दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने जूही चावलाची (Juhi Chawla) ही याचिका फेटाळून लावत 20 लाखांचा दंड ठोठावला. यावरून आता जूही चावलाने समाज माध्यमांवर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने स्वतःचं मत मांडत प्रतिक्रिया दिली आहे. जुहीने शेअर केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर (Social media) प्रसारित (Viral) होताना दिसतोय.

Indian Cricketers Match Fee | काय सांगता ! होय, भारतीय क्रिकेटर तासाला कमावतात एक लाख, ‘हे’ काम केल्यास मिळते मोठी रक्कम अन् बोनस वेगळा

 

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की,
नमस्कार काही दिवसामध्ये गोंधळ एवढा वाढला आहे की,
मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही.
याच गोंधळामध्ये मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज (Message) कदाचित विसरले आहे.
तो महत्वाचा मेसेज म्हणजे, आम्ही 5G नेटवर्क विरोधात नाही.
उलट आम्ही याचे स्वागत करीत आहोत. तुम्ही ते नक्की आणा.
आम्ही केवळ इतकंच बोलत होतो की, 5G नेटवर्क सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे.
असं जुही चावलाने आपल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.

Pune Crime News : कोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार

दरम्यान, तसेच, पुढे जुही चावलाने (Juhi Chawla) त्या व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे की, ‘आमचं सांगणं फक्त एवढंच आहे की, या नेटवर्कबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सर्व निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचे आहे की, ही टेक्नॉलॉजी (5g network) लहान मुले, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे. असं न्यायालयाने फटकारल्या नंतर जुही चवलाने व्हिडिओ शेअर करत स्वतः मत मांडलं आहे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’