जस्टिन बीबर अडकला विवाह बंधनात

वॉशिंग्टन :

जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबर हा त्याची गर्लफ्रेंड मॉडेल हॅले बाल्डविनसोबत लग्नबंधनात अडकला आहे. २४ वर्षीय जस्टीनने शुक्रवारी कोर्टात जाऊन लग्न केले असून लवकरच ते पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. बीबर हा कॅनेडियन गायक, गीतकार, आणि अभिनेता आहे.

जस्टीनने १० जुलैला त्याच्या व हॅले बाल्डविनच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपुडा करून लवकरच लग्न करणार असल्याची देखील घोषणा केली होती.

….म्हणून उच्च न्यायालयानेच आयोजित केला कबड्डीचा सामना 

शुक्रवारी सकाळी जस्टीन आणि हॅले हे दोघे लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोर्टात गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,  या दोघांच्याही घरातील काही मंडळी यावेळी तिथे उपस्थित होती. जस्टीन आणि हॅले लवकरच चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत .

१० मे २०१७ जस्टिन बीबरने डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पहिला लाईव्ह कार्यक्रम सादर करण्यासाठी आला होता . फिरायला रोल्स रॉईस, खासगी विमान, पंचतारांकित हॉटेलात राहायची व्यवस्था, योग करण्यासाठी खास खोली आणि प्रशिक्षक, झेड दर्जाची सिक्युरिटी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला वेगळं हेलिकॉप्टर यासारख्या सुविधांच्या मागणीमुळे तो भारतात चर्चेचा विषय ठरला होता .

[amazon_link asins=’B06XN6BY5V,B07B128DX7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95fadc3e-b8bf-11e8-afba-370b385c3294′]