‘त्या’ अभिनेत्याचा मृतदेह रिक्षात सापडल्याने प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाईनः दाक्षिणात्य अभिनेता विरुत्छगाकांत बाबू याचा मृतेदह चेन्नईमध्ये एका रिक्षात आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 24) ही घटना उघडकीस आली. त्याच्या मृत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विरुत्छगाकांत बाबू याचे झोपेतच निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे राहण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याला रिक्षात राहावे लागत होते. काही दिवसांपूर्वी तो एका मंदिराबाहेर दिसला होता. तसेच आई-वडिलांच्या निधनामुळे त्याला मोठा धक्का बसला होता. भारथ आणि संध्या या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.