अभिनेता शाहिद कपूरचं १६ वर्षानंतर ‘हे’ रेकॉर्ड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा ‘कबीर सिंह’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने २५० कोटीचा आकडा पार केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ३.३२ कोटीची कमाई केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २४९.६० कोटी झाले आहे.

या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी ५.४०, शनिवारी ७.५१, रविवारी ९.६१, सोमवारी ४.२५, मंगळवारी ३.२० आणि बुधवारी ३.११ कोटीची कमाई केली होती. ‘कबीर सिंह’ने पहिल्या आठवड्यातच १३४.४२ कोटी, दुसऱ्या ७८ कोटी आणि तिसऱ्या ३६.४० कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाने जर ३०० कोटीचा आकडा पार केला तर शाहिदसाठी एक इतिहासच होईल.

शाहिद कपूरने २००३ मध्ये ‘इश्क विश्क’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘कबीर सिंह’ शाहिदच्या करिअरचा सगळ्यात मोठा चित्रपट आहे. १६ वर्षानंतर शाहिद कपूरच्या नावाच्या रेकॉर्डची नोंदणी झाली आहे. ‘कबीर सिंह’ ने १३ दिवसात २०० कोटीची कमाई केली होती.

हा चित्रपट रेड्डी वांगा यांनी डायरेक्ट केला आहे. ‘कबीर सिंह’ तेलगू ब्लॉकबस्टर ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट देखील प्रेक्षकांची खूपच पसंतीस पडला होता. यामध्ये एक पागल प्रेमीची कहानी आहे. चित्रपटात शाहिदने शानदार भूमिका पार पाडली आहे. कियारा आडवाणी आणि शाहिद कपूरच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

 

Loading...
You might also like