Kajol And Ajay Devgn | अजयने ऑन स्क्रीन किस केल्यामुळे भडकणाऱ्या काजोलने आगामी वेबसिरिजमध्ये दिले लिपलॉक सीन; अजयला मागावी लागली माफी

पोलीसनामा ऑनलाइन – Kajol And Ajay Devgn | बॉलीवुडमध्ये अनेक अभिनेते व अभिनेत्री आजही ‘नो किसिंग पॉलिसी’ (No Kissing Policy) फॉलो करत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan), अजय देवगन तसेच अनेक अभिनेत्री आहेत. मात्र अनेकांनी चित्रपटाच्या कहानीमधील गरजेमुळे ‘नो किसिंग पॉलिसी’ मोडल्या आहेत. यामध्ये अजय देवगन (Ajay Devgn,), शाहिद कपूर, शाहरुख (Shah Rukh Khan) व ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai) यांचा समावेश आहे. मात्र चित्रपटामध्ये किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्री काजोल ही अजय देवगण (Kajol And Ajay Devgn) वर खूप चिडली होती. आता मात्र काजोल देखील जबरदस्त किसिंग सीन देताना दिसत आहे.

 

 

 

अभिनेत्री काजोल व अभिनेता अजय देवगण ही बॉलीवुडमधील प्रसिद्ध जोडींपैकी आहे. हे कपल अनेक वर्षे ऑन स्क्रीन ‘नो किसिंग पॉलिसी’ फॉलो करत होते. मात्र सध्या अनेक चित्रपटांमध्ये सहज हे सीन दिले जातात. हे कपल कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांना ‘नो किसिंग पॉलिसी’ तोडल्याबद्दल विचारण्यात आले यावेळी त्यांनी उत्तर दिले. अजय देवगन ‘शिवाय’ चित्रपटामध्ये (Shivaay Movie) ऑन स्क्रीन किसिंग सीन दिले होते. काजोल यामुळे खूप चिडली होती असे त्यांनी कबुल केले आहे.

 

 

कपल शर्मा शोमध्य़े अजय व काजोल सहभागी झाले होते. तेव्हा कपिलने काजोलला प्रश्न केला की, अजय देवगणला चित्रपटात किस करताना (Ajay Devgn Kissing Scene) पाहून तुझी प्रतिक्रिया काय होती. यावर काजोलने खुलासा केला की ती या चित्रपटाची सहनिर्माती असून तिला या सीनबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. काजोलने पुढे सांगितले होते की, अजयच्या किसिंग सीनमुळे ती खूप चिडली होती. मात्र अजयने तिची माफीही मागितली होती. ‘शिवाय’ चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगण यांनी केले होते.

 

 

अजय देवगनने न सांगता किसिंग सीन दिला म्हणून चिडणारी काजोलने (Kajol And Ajay Devgn) देखील आता तिची 29 वर्षांची नो किसिंग पॉलिसी संपुष्टात आणली आहे. काजोल ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) ओटीटी चित्रपटामध्ये ऑन स्क्रीन रोमांस (Kajol Romantic Scene) करताना दिसली होती. आता काजोल तिच्या आगामी ‘द ट्रायल’ वेबसिरिजमध्ये लिपलॉक सीन (Kajol Liplock scene) करताना दिसणार आहे. यामध्ये काजोलने तिच्या पतीच्या भूमिकेत असणारा जिशू सेनगुप्तासोबत (Jisshu Sengupta) लिपलॉक सीन दिला आहे. तसेच काजोलच्या एक्स बॉयफ्रेंडची भूमिका करणारा अली खानही एका सीनमध्ये काजोलला किस करतो.

 

Web Title : Kajol And Ajay Devgn | kajol once got angry on husband ajay devgn kissing scene now she broke her no kissing rule
and lip locked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा