ACB Trap News | 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शेतरस्ता मिळण्यासाठी तहसील कार्यालय उस्मानाबाद (Tehsil Office Osmanabad) येथे दाखल केलेल्या अर्जाच्या अंतिम निकालावर तहसीलदार यांची सही घेऊन निकाल देण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand a Bribe) जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील (Revenue Department) महिला कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा दाखल केला आहे. स्वाती ज्योतीराम खताळ (Swati Jyotiram Khatal) असे गुन्हा (FIR)दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे (Female Employee) नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) सोमवारी (दि.17) गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने उस्मानाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. ज्योती खताळ या जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद (Collector Office Osmanabad) येथे महसुल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पथकाने 21,26 जून आणि 17 जुलै रोजी पडताळणी केली होती. पडताळणीमध्ये खताळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार यांचे मालकीचे शेत गट क्रमांक 292 मधील क्षेत्रासाठी शेतरस्ता मिळावा यासाठी
तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जाचे अंतिम निकालावर तहसीलदार
यांची स्वाक्षरी घेऊन निकाल देण्यासाठी खताळ यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap News) याबाबत तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता स्वाती खताळ यांनी लाचेची मागणी करुन पैसे स्विकारण्याचे मान्य केले. मात्र, खताळ यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. स्वाती खताळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre)
यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक विकास राठोड
(PI Vikas Rathod) पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णु बेळे,सचिन शेवाळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : ACB Trap News | FIR by ACB against woman employee of revenue department who demanded Rs 10 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा