Kajol And Madhuri Dixit | काजोलला माधुरी दीक्षित वाटते बॉलीवुडमधील सर्वात जास्त…

पोलीसनामा ऑनलाइन – Kajol And Madhuri Dixit | अभिनेत्री काजोल ही सध्या तिच्या वेबसिरिजमुळे चर्चेमध्ये आहे. अभिनेत्री काजोलच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) या वेबसिरिजमधील अभिनयाचे व बोल्ड सीनचे (Kajol Bold scene) चाहत्यांकडून कौतुक देखील होत आहे. दरम्यान एका इंटरव्ह्यु मध्ये काजोलने अभिनेत्री माधुरी दीक्षितबाबत (Kajol And Madhuri Dixit) एक गोष्ट शेअर केली. काजोलच्या या बोलण्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.

अभिनेत्री काजोल व अभिनेत्री माधुरी दीक्षित या दोन्ही अभिनेत्रींनी बॉलीवुडचा एक काळ गाजवला आहे. अनेक हिट चित्रपटांमधून (Bollywood Hit Movies) माधुरी व काजोलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तीन दशके या अभिनेत्री सिनेविश्वात काम करत आहेत. एकेकाळी या दोन्ही अभिनेत्रींनी एकमेंकींना आपली कॉम्पिटिशन मानले होते.( Kajol VS Madhuri) मात्र मुलाखतीमध्ये काजोलला फिल्म इंडस्ट्रीत ती कोणाला सर्वात जास्त अंडररेटेड मानते? (Bollywood Underrated Actor) असा प्रश्न केला. यावर काजोलने अभिनेत्री माधुरी दीक्षितचे नाव घेतले. काजोल म्हणाली की माधुरी आणखी विविध प्रकारच्या भूमिका करु शकली असती. आणि ती अशा वेगळ्या भूमिका डिजर्व सुद्धा करत होती. तिचे हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटले.

अभिनेत्री काजोल व अभिनेत्री माधुरीने (Kajol And Madhuri Dixit) कधीही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. मात्र दोघींमध्ये आता चांगली मैत्री असल्याचे चित्र पाहायला मिळते. मनीष मल्होत्राच्या (Designer Manish Malhotra) दिवाळी पार्टीमध्ये दोघींना एकत्र मस्ती करताना पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काजोल व माधुरीने एकत्र काम केले नसले तरी अजय देवगन (Ajay Devgn) व माधुरीने एकत्र काम केले असून त्यांनी शेवटची ‘टोटल धमाल’ (Total Dhamal) चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. सध्या अभिनेत्री काजोल ही तिच्या ओटीटीवरील परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. तिची ‘लस्ट स्टोरी 2’ सिरिज गाजली असून लवकरच दुसरी सिरिज ‘द ट्रायल’ (The Trial Web Series) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘द फेम गेम’ (The Fame Game) आणि ‘मजा मा’ (Maja Ma) या चित्रपटांमध्ये शेवटची झळकली होती.

Web Title : Kajol And Madhuri Dixit | kajol said madhuri dixit an underrated actress know the reason Entertainment News

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page andTwitter for every update

हे देखील वाचा

Kangana Ranaut | कंगनासाठी ‘हा’ अभिनेता झाला होता बायकोलाही सोडण्यास तयार

Anushka Sharma | अनुष्का शर्माने सांगितले रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये न येण्याचे कारण

Congress Leader On NCP Crisis | ‘मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित…’ राष्ट्रवादीमधील बंडखोरीवरुन काँग्रेस नेत्याचे मोठं विधान

Pune MCOCA Case | कर्वेनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणार्‍या पप्पुल्या वाघमारेसह 9 जणांवर ‘मोक्का’, CP रितेश कुमार यांची 33 वी कारवाई

Maharashtra Politics News | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप?, राष्ट्रवादीनंतर ‘हा’ गट सत्तेत येणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्याध्यापकाला चोप