Anushka Sharma | अनुष्का शर्माने सांगितले रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये न येण्याचे कारण

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता रणवीर सिंग (Anushka Sharma) हे आता आपापल्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. या दोन्ही स्टार्सने सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र एक काळ असा होता ज्यावेळी रणवीर व अनुष्काचे अफेअर (Anushka And Ranveer Affair) चालू आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडायचा. या अफवांवर व रणवीर सोबत असलेल्या तिच्या नात्यावर अनुष्काने (Anushka Sharma) एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले होते.

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरत होती. प्रेक्षकांना ही जोडी आवडत असल्यामुळे अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले. ते अनेकदा एकत्र देखील दिसत होते. मात्र ते कधी रिलेशनशिपमध्ये का नाही याबाबत अनुष्काला विचारण्यात आले. एका मुलाखतीमध्ये अनुष्काने तिच्या व रणवीरच्या नात्यावर मत मांडले. अनुष्का म्हणाली की, आमचे नाते हे फार अस्थिर आहे. आम्ही एकमेंकांना मारु शकतो. मी त्याचे डोके फोडू शकते तर तो देखील माझे डोके फोडू शकतो. तसेच त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा फार वेगळा आहे. रणवीर हा खूप प्रॅक्टिकल विचार करणारा व्यक्ती आहे. पण मी तशी नाहिये. पूर्णपणे प्रॅक्टिकल व्यक्ती म्हणून नाही राहू शकत. मला तो व्यक्ती म्हणून आवडतो. जर मला दुसर्‍या पुरुषासोबत राहण्याची गरज असेल, तर मला त्याला शांत करावे लागेल. म्हणून आमचे नाते चांगले नाही. आम्ही दोघंही खूप उत्साही माणसं आहोत. पण मला वाटतं की मी रिलेशनशिपमध्ये राहायला तयार नाही.

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या लग्नाविषयीच्या कल्पना बोलून दाखवल्या होत्या. (Anushka Sharma Weeding) ती म्हणाली होती की, लग्न ही महत्त्वाची गोष्ट असून मला देखील लग्न करण्याची इच्छा आहे. मला बाळ देखील हवं आहे. 2017 साली अनुष्का क्रिकेटर विराट कोहली (Anushka And Virat Kohli) सोबत लग्न केले. ती बोलली होती तिला लग्नानंतर काम करण्याची इच्छा नसेल. अनुष्का शेवटीची 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात (Zero Movie) झळकली होती. (Anushka Sharma And Ranveer Singh) अभिनेता रणवीर सिंग सुद्धा अभिनेत्री दीपिका पादुकोण (Ranveer Singh And Deepika Padukone) सोबत 2018 साली विवाहबंधनात अडकला. हे दोन्ही कपल बी-टाऊन मधील प्रसिद्ध कपल असून ते आता पार्टनरसोबत आनंदी व समाधानी आहेत.

Web Title :  Anushka Sharma | anushka sharma once reveals about never dating ranveer singh said i like him

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page andTwitter for every update

हे देखील वाचा