Kangana Ranaut | कंगनासाठी ‘हा’ अभिनेता झाला होता बायकोलाही सोडण्यास तयार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची पंगा क्वीन अशी ओळख असलेल्या अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे व चित्रपटातील कामांमुळे चर्चेत असते. कंगनाचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. असाच तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेता कंगना राणौतसाठी (Kangana Ranaut) त्याच्या बायकोलाही सोडण्यासाठी तयार झाला होता.

करण जोहरच्या कॉफी विथ करण (Coffee With Karan) या शोमध्ये एकदा अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) व अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) अभिनेत्री कंगना राणौत सोबत शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी करण तिघांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारत होता. करणने (Karan Johar) कंगना राणौत ला प्रश्न विचारला की तू स्वत:वर काम करते का? यावर कंगना उत्तर देताना होय बोलली तर करण पुन्हा मध्येच म्हणतो की मला वेगळ्या प्रकारे म्हणायचे आहे. (Kangana VS Karan Johar) यावर कंगना लाजते व त्याला विचारते की तुला काय जाणून घ्यायचे आहे ते उघडपणे सांगशील का? त्यावर करण प्लास्टिक सर्जरीकडे इशारा करतो. यावरही कंगना उतर देते की, मी हे केले नाही कारण मी तरुण आहे आणि उत्तरेकडील मुलींना आशीर्वाद दिला जातो.

यानंतर करण अभिनेता अनिल कपूरकडे वळतो. करण अनिलला प्रश्न विचारतो की, जर त्याला पत्नीशिवाय एक स्त्री निवडायची असेल तर कोणाला निवडेल? येथे हॉलिवूडमधील कोणाचेही नाव घेण्याची परवानगी नाही. असेही तो म्हणतो. या प्रश्नाचे उत्तर अनिल कपूरने लगेचेच दिले आणि तो म्हणाला की, ती कंगना असेल. कॉफी विथ करण चॅट शोमधील (Kangana In Coffee With Karan) हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे. यावर कंगनाच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

कंगनाला (Kangana Ranaut) कॉफी विथ करण शोमध्ये वागवलेल्या या चुकीच्या पद्धतीमुळे करण व अनिल कपूरवर जोरदार टीका केली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे तर काहींनी कमेंट करुन रोष व्यक्त केला आहे. एकाने यावर कमेंट केली आहे की, म्हणूनच कंगना त्याचा इतका तिरस्कार करते हे आश्चर्यकारक नाही. या गोष्टी वर्षांनुवर्षे जमा झाल्या आहेत. अनिल कपूरचे उत्तर लोकांना आवडलेले नसून दिवसेंदिवस त्यांचे रंगीन किस्से समोर येत आहेत. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे, कसे तिला वायफळ प्रश्न विचारून मुद्दाम कॉर्नर केले जात होते. बिचारी अभिनेत्री फक्त हसत राहिली. त्यामुळे ती सर्वात रागिष्ट अभिनेत्री बनली, यात काहीच शंका नाही. असे मत नेटकरी व्यक्त करत आहेत. यापूर्वी कंगनाचे करणला खडेबोल सुनावलेले अनेक कॉफी विथ करण या चॅट शोमधील व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता हा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Web Title : Kangana Ranaut | this actor was ready to leave his wife for kangana ranaut the video went viral

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page andTwitter for every update

हे देखील वाचा