काजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा विरोध, खुद्द काजोलने केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगणची ( Ajay Devgn) जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन चाहत्यांची आवडती आहे. दोघेही सुखांने संसार करत आहेत. त्यांच्या लग्नाला जवळपास 22 वर्षे होणार आहेत. काजोल आणि अजय देवगणच लग्न हे तिच्या वडिलांच्या इच्छेविरूद्ध झाल्याचा खुलासा खुद्द काजोलने केला आहे. यात तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता, असे तीने सांगितले.

काजोल आणि अजय देवगणचे लग्न 24 फेब्रुवारी 1999 रोजी झाले. यावर्षी त्यांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण होतील. दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चालले आहे. त्यांना नीसा आणि युग अशी दोन मुल आहे. दोघेही पालकांची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत. लग्नानंतरही काजोल आज चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. काजोलने एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, तिचे वडील शोमू मुखर्जी वयाच्या 24 व्या वर्षी लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते. लग्नाआधी काजोलने काम करावे अशी त्याची इच्छा होती. मात्र, काजोलच्या या निर्णयाला तिची आई तनुजा यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला. तीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास काजोलचा ‘त्रिभंगा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 2020 मध्ये ‘तान्हाजी’ सुपरहिट ठरला होता.