कळंब पोलिस स्टेशन समोर अवैध धंदे दुकान आंदोलन

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब शहरामध्ये अवैध धंद्याला ऊत आला असून शहरामध्ये अराजकता माजली आहे कळंब शहरातील शिवाजी चौकात आंबेडकर चौक बस स्टँड आशा अनेक ठिकाणी मटका, जुगार व गुटखा हे राजरोसपणे विक्री हि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहे वरील ठिकाणे हि वर्दळीची असून यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, महिला यांना रस्त्याने जाताना त्रास होत आहे. छेडछाडीच्या प्रकरणात वाढ झाली असून महिलांना त्रास होत आहे.

त्यामुळे शरीरातील शांतता भंग पावल्याचे दिसत आहे. गुटख्याची खुलेआम विक्री जोमात चालू आहे लाखो रुपयांची उलाढाल यामधून होत असून, तरूण पिढी व्यसनाधीन होत मटका जुगारामध्ये आर्थिक नुकसान होत असून आत्महत्या प्रकरणात वाढ झाली आहे असे दिसून येते. मटका जुगार खेळत असताना केलेल्या कारवाईत मुख्य आरोपी यांना सोडून देण्यात येते आणि फंटरला आणून केसेस केल्या जात आहेत 20 – 20 वर्षे झाली मटका जुगार चालवत असताना अनेक गुन्हे दाखल असताना त्यांना तडीपार केले जात नाही.

त्यामुळे यांच्या उत्साह जास्त वाढत असून पोलिस प्रशासनाचा वचक कमी झाल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सर्व अवैध धंदे चालू आहेत. त्यामुळे या सर्व अवैध रित्या चालू असलेल्या वाळू गुटखा, मटका, जुगार दुकाने बंद करण्यात यावे असे निवेदन मा. पोलिस अधीक्षक साहेब उस्मानाबाद यांना मा. पोलिस उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत 31/01/2020 रोजी देवून देखील कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसून रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.

दि 14/02/2020 रोजी खुलेआम मटका विक्रीचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. परंतू पोलिस प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने कळंब पोलिस स्टेशन समोर गुटखा वाळू मटका जुगारचे प्रतिकात्मक दुकान 17/02/2020 रोजी संवैधानिक मार्गाने आंदोलन सुरू करण्यात आले असून येणाऱ्या काळात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते.

आपण या जन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना उस्मानाबाद अनिल हजारे, युवानेते लखन गायकवाड, विठ्ठल मामा समुद्रे, भारत जाधव, विशाल वाघमारे, आदमाने शरद, सम्राट गायकवाड, अ‍ॅड. आबासाहेब पायाळ, आप्पासाहेब हजारे, सिद्धार्थ धावारे, सुरज हजारे, दीपक गायकवाड, पृथ्वी गाडे, जिवन ओव्हाळ, आदित्य ओव्हाळ, राकेश कोमटवार, कांबळे नोबल, अमोल पवार, जाधव अभिमान, राहुल गाडे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी झाले होते