Kale Padal Hadapsar Crime News | पुणे : काळेपडळ येथे वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kale Padal Hadapsar Crime News | हडपसर भागातील काळेपडळ परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य सूर्यवंशी, आदित्य मोहोळकर यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणेनगर (Sasane Nagar Hadapsar) येथे घडला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सहा जणांना अटक केली आहे.(Kale Padal Hadapsar Crime News

याबाबत अमोल बाळासाहेब लोंढे (वय 19, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणई प्रेम सुरेश सुरवसे (वय-18), रोहन समींदर कांबळे (वय-18 दोघे रा. शिवतेजनगर, काळेपडळ, पुणे) यांना हडपसर भागातून अटकरुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर चैतन्य संपती सुर्यवंशी (वय-18), रोहित शहाजी सुतार (वय-18), प्रभाकर उर्फ राध्या सोमनाथ तोटे (वय-18), आदित्य हनुमंत मोहोळकर (वय-18 सर्व रा. काळेपडळ, हडपसर) यांना फुरसुंगी परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी आयपीसी 143, 144, 145, 148, 149, 336, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अॅमेन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद होता. फिर्यादी अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाणे यांनी काळेपडळ परिसरात टँकर मागविला होता. ते टँकरद्वारे सय्यदनगर येथे पाणी वाटप करत होते. त्यावेळी टँकरचा धक्का चैतन्य आणि आदित्य यांना लागला. यातून झालेल्या वादातून आरोपींनी रात्री दोनच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात व ससाणेनगर येथील शाळेच्या मैदानाच्या बाजूला पार्क केलेल्या कार, टेम्पो, रिक्षा अशा एकूण 15 ते 20 वाहनांची दगड व हत्याराने तोडफोड करुन दहशत निर्माण केली होती.


दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व हत्यार जप्त केले आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयकुत् प्रविण पवार,
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे
यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे,
पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे,
भगवान हंबर्डे, अजित मदन, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर,
रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरने 3 लाख घेतले

Ravindra Dhangekar On Sassoon Doctors | पोर्शे कार अपघात प्रकणात ससूनच्या डॉक्टरांना अटक, धंगेकर म्हणाले – ‘त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल’

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन कचऱ्यात टाकल्याची पोलीस आयुक्तांची माहिती (Video)

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग नंतर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती (Video)