अभिनेत्री ‘काम्या पंजाबी’नं बॉयफ्रेंडसाठी ठेवलं ‘करवा चौथ’चं व्रत, भांगेत भरला सिंदूर, हातावर काढली मेंदी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकप्रिय टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉसची एक्स स्पर्धक काम्या पंजाबी सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. काम्याने स्वत: याबाबत खुलासा केला होता. काही दिवसांपूर्वीच तिने आपले व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले होते. शलभ डांगसोबत आयुष्य काढण्याचा ती विचार करत आहे. कालच तिने करवा चौथ निमित्ताने आपल्या बॉयफ्रेंडसाठी व्रत ठेवलं होतं. याचे काही फोटोही काम्याने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Happy Karwachauth ❤️

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

काम्याचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. यात ती छान साडीत दिसत आहे. तिच्या कपाळावर कुंकू आणि भांगात सिंदूरही दिसत आहे. काम्या बिग बॉसमध्ये असताना त्यातील स्पर्धक मनवीर गुर्जरसोबतही तिचं नाव जोडलं गेलं आहे. नंतर मात्र दोघांनीही अफेअरच्या चर्चेला अफवा म्हटलं होतं.

View this post on Instagram

❤️ @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

कामाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या काम्या शक्ति अस्तित्व के अहसास की ही मालिका करत आहे. यात तिची नकारात्मक भूमिका आहे. गेल्या एक दशकापासून काम्या इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like