कंगना रणौत कोरोनामुक्त, म्हणाली – ‘नाही सांगणार Covid वर कशी केली मात, लोकांना वाईट वाटेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, आता तिने कोरोनावर मात केली आहे. तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आपण कोरोनाला कस हरवलं हे सांगणार नसल्याचे तिने म्हटले आहे.

कंगनाने तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. परंतु, मी कशा प्रकारे कोरोना विरुद्धची लढाई जिंकली हे सांगितले तर अनेकांना वाईट वाटेल. त्यामुळे मी सांगणार नाही असे तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टमध्ये तिने असेंही लिहिलं आहे , नमस्कार आज मी कोरोना निगेटिव्ह झाले. मला खूप काही सांगायचे आहे. खूप सांगण्याची इच्छा आहे की मी कोरोनाला कशा पद्धतीने हरवलं. पण मला सांगण्यात आले की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करु नको.

कंगना पुढे लिहते की, हो असे काही लोक आहेत ज्यांना कोरोनाविषयी वाईट बोलल्यास वाईटच वाटते. असो तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. या कारणामुळे कंगनाने आपण काही बोलणार नसल्याचे म्हटले आहे. कंगनाचा 8 मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

दरम्यान, कंगनला हिमाचलला जायचे होते. त्यासाठी तिने कोरोना टेस्ट केली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिने घरीच स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. त्यावेळी तिने म्हटले होते की, मागील काही दिवसांपासून थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. तसेच डोळ्यात थोडीशी जळजळ होत होती. त्यामुळे मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते. त्यासाठी कोरोना टेस्ट केली. त्यावेळी समजले की मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.