सुप्रिया सुळेंच्या विजयाबद्दल कांचन कुल यांनी दिल्या शुभेच्छा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी  खासदार सुप्रिया सुळे यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुकपेजवर फोटो टाकून सुप्रिया सुळे यांचे बारामती लोकसभा मतदार संघात झालेल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कांचन कुल या दौंडचे रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी असून सुप्रिया सुळेंनी त्यांचा तब्बल 1,55000 हजार मतांनी पराभव केला आहे.

कुल आणि सुळे यांच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कांचन कुल या सुप्रिया सुळेंना काटे की टक्कर देतील असा अंदाज वर्तवला जात होता परंतु सुप्रिया सुळेंनी जवळपास सर्वच मतदार संघातून मोठे मताधिक्य घेत कांचन कुल यांचा पराभव केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like