कंगनानं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक ! संतापलेले ट्रोलर्स म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळं आणि फोटोंमुळं ती चर्चेत येत असते. कधी कधी तर तिला ट्रोलही केलं जातं. आपल्या बिकिनी फोटोमुळं कंगना पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहे.

कंगनानं तिच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बिकिनीत दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, ती समुद्रकिनारी पाठमोरी बसली आहे. कंगनाचा हा फोटो मेक्सिकोमधील आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर जोरदार चर्चेत आहे.

कंगनाचा हा बिकिनी लुक समोर आल्यानंतर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/MDFaizan2047/status/1341580860173086720?s=20

काहींनी तिला संस्कारी क्वीन म्हटलं आहे तर काहींनी मात्र कंगना संस्कृती विसरली आहे असंही म्हटलं आहे. काहींना वाटत आहे की, जी सतत देशाच्या संस्कृती बद्दल बोलत असते तिनं बिकिनीतील फोटो शेअर करू नये.

https://twitter.com/SagarNarale18/status/1341603222767632386?s=20