Kangana Ranaut | कंगणाचा चंद्रमुखी 2 चित्रपटातील जबरदस्त शाही फर्स्ट लूक आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Kangana Ranaut | बॉलीवुडची पंगा क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत ही आता सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आली आहे. कंगणाचा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अगदी शाही अंदाजमध्ये अभिनेत्री कंगना राणौत फोटोमध्ये दिसत असून चाहत्यांना तिचा हा लूक (Kangana Ranaut Chandramukhi 2 Look) प्रचंड आवडला आहे. अभिनेत्री कंगना तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा हा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री कंगना राणौत हिच्या ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ती राजेशाही थाटात दिसून येत आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून हेव्ही ज्वेलरी देखील स्टाईल केली आहे. तिचा ब्लाऊज देखील पूर्णपणे स्टाईलिश परिधान केला आहे. कंगनाची ज्वेलरी व खास करुन तिचा कंबरपट्टा लक्षवेधी ठरत असून चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या पोस्टखाली कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सौंदर्यवती… आणि तिच्या अदा… लक्ष वेधून घेणारी ‘चंद्रमुखी’. शाही थाटात सादर करत आहोत ‘चंद्रमुखी 2’ सिनेमातील कंगना राणौतचा लूक…” अभिनेत्री कंगना राणौतचा हा लूक नेटकऱ्यांना खूप आवडला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनोरंजन विश्वामध्ये सुपरहिट ठरलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा (Chandramukhi Movie) सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटामध्ये रजनीकांत (Rajinikanth) आणि ज्योतिका (Jyothika) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे कथानक पी. वासु (P. Vasu) यांनी लिहिले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असून ‘चंद्रमुखी 2’ याचे लेखन व दिग्दर्शन पी. वासु करणार आहे.

चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना राणौत व अभिनेता राघव लॉरेन्स (Raghava Lawrence) प्रमुख भूमिका साकारणार आहे.
यापूर्वीच राघवचा पहिला लूक आऊट करण्यात आला होता. आता कंगनाचा लूक देखील रिलीज
(Kangana Ranaut Chandramukhi 2 Look) करण्यात आला आहे.
सोबतच चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख (Chandramukhi 2 Release Date) देखील जाहीर करण्यात आली आहे.
येत्या 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा चित्रपट एकाच वेळी तामिळ,
हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेते रजनीकांत व ज्योतिका
देखील चित्रपटामध्ये स्पेशल अपीयरन्स मध्ये झळकणार आहेत. ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटाची प्रेक्षक व कंगनाचे
चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Desai Suicide Case | कंपनी बँकेच्या नियमांना धरुन चालत नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट चर्चेत