Kangana Ranaut | कंगना रणौत विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तक्रार दाखल; म्हणाले – ‘मेंटल हॉस्पिलटमध्ये पाठवा किंवा…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्यावर संपूर्ण देशभरातून टीका करण्यात आली होती. याचदरम्यान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शेतकरी विरोधातील 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर कंगनाने (Kangana Ranaut) रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. तिच्या या वक्तव्यावरून दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे (The Delhi Sikh Gurdwara Management Committee) कंगनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हि तक्रार दाखल करण्यात आली.

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) नाराजी व्यक्त केली. तिने आपल्या पोस्टमध्ये कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून मोदी सरकारचा (Modi Government) हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले होते.

भावना दुखावण्याच्या हेतूने कंगनाने केली पोस्ट

“शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की या वक्तव्याविरोधात प्राधान्याने तक्रार दाखल करुन घ्यावी. तसेच याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

‘कंगना तुरुंगात किंवा मानसिक रुग्णालयात पाठवा’

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा (Manjinder Singh Sirsa, Chairman, Delhi Sikh Gurdwara Management Committee) यांनी शिखांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगनावर (Kangana Ranaut) जोरदार टीका केली ‘कंगनाला एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले पाहिजे किंवा तुरुंगात पाठवले पाहिजे. अशी मागणी सिरसा यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. तसेच तिच्यावर सरकारने कारवाई करावी असेसुद्धा ते म्हणाले.

 

Web Title :- Kangana Ranaut | police complaint against kangana ranaut for derogatory language against sikh community manjinder sirsa demands she be either sent to jail or mental hospital marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

 

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या