मी स्वतःच्या जीवावर स्टार झाले, बापाच्या नाही, कंगनाने ‘या’ अभिनेत्रीला सुनावलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर अभिनेत्री कंगना रणावतनेही क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शित विकास बहल याच्यावर कंगनाने आरोप केला. #metoo या मोहिमेअंतर्गत हळूहळू आणखी काही अभिनेत्री पुढे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे बॉलीवूडमध्ये दोन गट पडल्याचं समोर येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ddaa97c-cadf-11e8-be63-4bd85a2be43e’]

कंगनाच्या वक्तव्याविषयी सोनम कपूराला ‘वोग वी द वुमन या कार्यक्रमाच्या इव्हेंटमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने ‘कंगना बऱ्याच गोष्टीवर आपलं मतप्रदर्शन करते. पण कधी कधी त्या गोष्टी गांभीर्यानं घेणं किंवा त्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. असं उत्तर दिलं होतं. तिनं दिलेली उपरोधिक प्रतिक्रिया कंगनाच्या चांगलीच जिव्हारी लागली.

आपण केलेल्या आरोपांवर अभिनेत्री सोनम कपूरनं जाहीर अविश्वास दाखवल्यानं कंगना चांगलीच संतापली आणि तिनं सोनमला ‘मी मेहनतीने स्टार झाले, बापाच्या नावावर नाही’, अशा शब्दात तिची कानउघडणी केली.

कंगना म्हणाली की मला चूक बरोबर ठरवण्याचा अधिकार सोनमला कुणी दिला ? कोणत्या महिलेवर विश्वास ठेवावा, कुणावर नाही, याचा परवाना सोनमकडे आहे का? माझ्या आरोपांवर ती कसे प्रश्न उपस्थित करू शकते. मी अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मी आपल्या वडिलांच्या नावामुळे या इंडस्ट्रीत ओळखली जात नाही, मेहनत करून स्वत: जागा निर्माण केली आहे. सोनम चांगली अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही किंवा चांगली वक्ता देखील नाही. या फिल्मी लोकांना माझी चेष्टा करण्याचा अधिकार देतं कोण’, असा सणसणीत प्रतिहल्ला तिनं चढवला आहे.

[amazon_link asins=’B01L3I1BF0,B01I59VBLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99f2e46b-cadf-11e8-b7c3-cd690af4970b’]

कंगनाच्या या प्रतिक्रियेने कपूर परिवारालाच या वादात ओढलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार अशी शक्यता आहे.यापूर्वीही कंगनाने करणं जोहरला इंडस्ट्री तुझ्या बापाची नाही असे सुनावले होते.