दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला स्वत:चा VIDEO आणि झाले असे काही…

छत्तीसगड : वृत्तसंस्था – एका दांपत्याला त्यांच्या अश्लील व्हिडीओ एका पॉर्न साईटवर पाहिल्यावर धक्का बसला. या दांपत्याने आपल्या वैयक्तीत क्षणाचा व्हिडीओ शूट केला. मात्र, हा व्हिडीओ तयार करणे या दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे. या व्हिडीओमुळे त्या दांपत्याची बदनामी तर झालीच शिवाय त्यांना आर्थिक नुकसानही झालं. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्य़ंत पोहचले. पोलिसांनी केलेल्या तपासात अखेर सत्य उघड झालं.

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील एक प्रेयसी दाम्पत्याने मुलीच्या मोबाईलमध्ये स्वत:चा अश्लील व्हिडीओ चित्रीत केला. व्हिडीओ मुलीच्या मोबाईल फोनमध्ये होता. काही दिवासांनी मुलीचा मोबाईल फोन खराब झाल्याने तिने तो दुरुस्तीसाठी कोंडागाव जिल्ह्यातील मोबाईल शॉपीमध्ये दिला. फोन मोबाईल शॉपीत दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हा सगळा प्रकार सुरु झाला आणि दांपत्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांची मदत मिळेपर्य़ंत या व्हिडीओमुळे त्यांची समाजात बदनामी झाली होती.

मुलीचा मोबाईल फोन दुरुस्त करताना मोबाईल शॉपीमधील प्रदीपकुमार याने तो व्हिडीओ पाहिला. त्याने तो व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घेतला. यानंतर मुलीला तिच्या फोनवर फोन करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर करण्याची धमकी दिली. सुरुवातीला मुलीने पैसे दिले परंतु त्याच्या मागण्या वाढत गेल्याने अखेर तिने सगळा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.

कुटुंबाने आणि मुलीने याची तक्रार कांकेर येथील बुढवा पोलीस चौकीत केली. तर यात आरोपी युवकाने दाम्पत्याचा व्हिडिओ पॉर्न साईटवर शेअर केल्याचंही उघड झालं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like