कॉमेडी किंग कपिल शर्मा अडकणार विवाहबंधनात

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

‘कॉमेडी नाईट्स वुईथ कपिल ‘ ‘द कपिल शर्मा शो ‘ या धम्माल विनोदी कार्यक्रमांनी सुपरस्टार झालेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथसोबत शानदार सोहळ्यात कपिल लगीनगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3b382745-cae4-11e8-9fb8-ab1d37b56838′]

कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाची बातमी आहे. कपिल आणि गिन्नी सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेणार आहेत.
अमृतसरमध्ये चार दिवस कपिल-गिन्नीचा लग्नसोहळा रंगणार आहे. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात येईल. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कपिलने ट्विटरवरुन आपल्या प्रेयसीची ओळख करुन दिली होती.मी स्वतःच्या जीवावर स्टार झाले, बापाच्या नाही, कंगनाने ‘या’ अभिनेत्रीला सुनावलं

गेलं वर्षभर कपिल शर्माने कठीण काळ पाहिला. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील सहकलाकार सुनिल ग्रोवरशी खटके उडाल्याने कपिल वादाच्या भोवऱ्यात अडकला. कपिलने अनेक वेळा शेवटच्या क्षणी शूटिंग रद्द केली होती. त्यामुळे अजय देवगन, शाहरुख खान, इम्रान हाश्मीसारख्या बड्या कलाकारांना ताटकळत रहावं लागलं होतं. त्यानंतर सोनी वाहिनीवर ‘द कपिल शर्मा शो’लाही नारळ देण्यात आला. कपिलची प्रकृती बिघडल्यामुळे ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ हा नवा शोसुद्धा अवघ्या तीन एपिसोडमध्ये गुंडाळण्यात आला.

[amazon_link asins=’B01MTX7IXG,B07335K95J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7c7b8da-cae4-11e8-8725-b725a0decd90′]

कॉमेडी स्टार कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. शनिवारी कपिलच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केले. यावर त्याने लिहिले की, ‘मी लवकरच परत येतोय. ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन तुमच्यासाठी फक्त सोनी टीव्हीवर’ ट्वीटमध्ये कपिलने टाटा स्काय यूजर्सला सोनी टीव्ही पाहण्यासाठी हेल्पलाइन नंबर शेअर केला आहे.

पत्नीला सोबत राहु द्या ना! विराटच BCCI ला मागण….

लवकरच येणार  प्रोमो –

कपिलच्या ट्वीटनंतर सोनी चॅनलने ऑफिशियल स्टेटमेंट जारी करुन म्हटले की, कपिल लवकरच सोनी इन्टटेन्मेंट टेलिव्हिजनच्या सक्सेसफुल वीकेंडमध्ये कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन येत आहे. सोनी टीव्हीकडून सांगण्यात आले की, कपिलची क्रिएटिव्ह टीम आणि अॅक्टरसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्साहीत आहोत. चॅनलशी संबंधीत असलेल्या एका सोर्सने आयएएनएसला सांगितले की, येणा-या काही दिवसात शोचा प्रोमो ऑनएयर केला जाणार आहे. शो कधीपासून सुरु होणार याची काही माहिती देण्यात आलेली नाही.

पडद्यावर फीट दिसणार कपिल 

कपिल काही दिवसांपुर्वी बेंगलोरच्या एका डिटॉक्स सेंटरमध्ये मेकओव्हर करताना दिसला होता. कपिलचा लठ्ठ झालेला फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . पण आता आगामी टीव्ही शो मध्ये फिट कपिल पाहायला मिळणार आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da72a286-cae4-11e8-a8e7-6d03b44e89a2′]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like